लोकशाही ही केवळ शासनाचा औपचारिक प्रकार एवढीच ओळख राहता कामा नये!
वर्तमान नवभांडवली, मध्यमवर्गीय, उदारमतवादी, भौतिकवादी जगात मतदार हा मुक्त होऊ पाहत आहे, पण तितकाच तो मतदान प्रक्रियेपासून दूर जात आहे. त्यांना मतदान करणं ही निव्वळ औपचारिकता वाटायला लागलेली आहे. वंचित, शोषित, गरजू यांना लोकशाहीचं प्रेम गरजेतून येत आहे. लोकशाही हे मूल्य किंवा जीवनपद्धती न राहता सत्ताकारण आणि निवडणुका यापुरती सिमित झालेली आहे.......